अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर मंदिर संपूर्ण खान्देशातील भाविकांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. हे मंदिर तापी, पांझरा आणि गुप्तगंगा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी आणि दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते, परंतु गुरूवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून ऋषीपंचमीच्या शुभ मुहूर्तावर कपिलेश्वर मंदिरात महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.