राहुरी नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागातील नाली साफ सफाई, डास फवारणी व तणनाशक फवारणी स्ट्रीट लाईट व रस्त्याच्या समस्यां बाबत आज बुधवारी दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडत समस्यांचा पाढा वाचला.राहुरी येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.