आमदार संतोष बांगर यांच्या मातोश्री आजारी असल्याने त्यांची तब्येतीत लवकर सुधारणा होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने माझोड येथील रेणुका देवीला साकडे घालण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संतोष बांगर यांच्या मातोश्रीवर मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले असून त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होण्यासाठी महाआरती करून साकडे घालण्यात आले.