जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या कडगाव येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.