कर्ली खाडीतील शासनाच्या चोरी केलेल्या वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चार डंपर चालकांवर मालवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईत सुमारे २ कोटी २० हजार रुपयांची मालमत्ता ही जप्त करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी मालवण पोलीस ठाण्यात शनिवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दिली आहे.