पंचवटी भागातील कन्नमवार ब्रिजच्या खाली नदीपात्रात पाण्यावर तरंगताना एकाचा मृतदेह आढळून आला असून पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गुलशन नगर, वडाळा गाव,इंदिरानगर येथील राहणारा 32 वर्षीय शहबाज शकील शेख हा कन्नमवार ब्रिजच्या खाली नदीपात्रात पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांना आढळून आला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पंचवटी पोलिसांना माहिती दिली.अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यानी मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास सुरू आहे.