माण तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे नैसर्गिक संकट ओढावले आहे. याविषयी आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले असून येथे चार दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ते सरकारकडे येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य शेतकऱ्यांविषयी सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांना या अडचणीतून सरकार निश्चितपणे बाहेर काढेल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.