चोपडा शहरात शिरपूर जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नायरा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपा समोर वाहन क्रमांक एम.एच.०४ एफ.यु.५६७७ यामध्ये दोन गोवंश दगडू उर्फ किरण गुलाब पिंजारी हा घेऊन जात होता. पोलिसांनी त्याला पकडले त्याच्याकडून चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला व त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.