नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात ग्रामपंचायत आणि शिवसेना शिंदे गटाच्या संयुक्त विद्यमान महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत परिसरातील विधवा निराधार आणि दिव्यांग लाभार्थी महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बकाराम गावित यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होते.