आज दि 12 सप्टेंबर ला सकाळी 8 वाजता चंद्रपूर शहरात गांधी चौकात एक वेगळं आणि कुतूहल निर्माण करणारं दृश्य पाहायला मिळालं. आपल्या 'डाऊन टू अर्थ' स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार देवराव भोंगळे चक्क एका साध्या दुचाकीवरून शहरात एकटेच फिरताना दिसले. गांधी चौकातून जाताना त्यांना अनेकांनी पाहिलं आणि त्यांच्या साधेपणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. उत्सुकतेपोटी एकाने घेतलेला त्यांचा राईड व्हिडिओ समाजमाध्यमांत चांगलाचं वायरल होतयं.