महागाव तालुक्यातील पोखरी येथे आज दि. ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत गावकऱ्यांनी उत्साहात व भक्तीभावाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गणरायाला निरोप देण्यात आला. महिलांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान विसर्जन घाटावर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाचे विसर्जन शांततेत पार पडले.