धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. १९ ऑगस्टपासून सेवेत कायमस्वरूपी समावेश व ‘समान काम, समान वेतन’ या मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरू आहे. शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी मुलांसह सहभाग घेतला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा एकत्रीकरण समितीने दिला.