शेतीच्या वादातून मुलगा व सुनेने वृद्धास मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केला. वणी तालुक्यातील बोरगाव (खांदला) येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. विठ्ठल यादव देरकर (76) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी मारहाण करणारा मुलगा व सुनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.