उपविभागीय अधिकारी यांनी वैजापूर पोलिस ठाणे हद्दीतील 23 जणांना सहा सप्टेंबर पर्यंत वैजापूर हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात काळात कायदा व सुवास्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वारंवार शरीरा विरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सादर केला होता.