एरंडोल पोलिस स्टेशन हद्दीत ट्रक मधून सबमर्सिबल आणि सोलर पंप चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नागदुली गावाजवळील पदमालय फाट्याजवळून अटक केली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातून तब्बल २ लाख ३५ हजार रुपये किमतीचे पंप चोरीला गेले होते. ही घटना उमरदे गावाजवळ रस्त्यावर घडली होती.