भंडारा शहरातील नुरी मस्जिद खाम तलाव तसेच शहरातील प्रमुख मस्जिद मध्ये आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान बालविवाह संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन इंडियन वेल्फेअर सोसायटी भंडाराच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला बालविवाह मुक्त या अभियानाला इंडियन वेल्फेअर सोसायटी भंडाराचे जिल्हा समन्वयक अमोल पाणतावणे यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने शपथ घेण्यात आली. आणि संदेश देण्यात आला की, संपूर्ण भारतीयांनी तसेच जिल्हावासीयांनी बालविवाह रोखण्यासाठी...