भंडाराचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार हे नुकतेच भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर रुजू झाले आहेत. जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्ष कविता उईके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईकें यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.