आज दि ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील गणेश उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुक मार्गावर कन्नड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये तहसील रोड, अण्णाभाऊ साठे चौक, शनिमंदिर चौक, तिलकनगर, सिद्दीक़ चौक, बाजारपेठ, जामा मशिद, साप्ताहिक बाजार, सीतलमाता मंदिर, शिवाजी नगर मार्गे पुन्हा पोलिस ठाण्यात समारोप झाला.