रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर आयोजित कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. तालुका भर फिरून गेले दोन दिवस तज्ञ परीक्षकांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. आज या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत मिरजोले येथील आशिष वाडकर आणि परिवाराने हुबेहूब साकारलेला श्री देवभैरी मंदिर देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेची उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार कीरण तथा भैया शेठ सामंत यांनी स्पर्धेची दखल घेतली आहे.