सेनगांव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे मराठा बांधवांसाठी पुऱ्या व इतर खाद्यपदार्थ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले असून त्यांना समर्थन दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. मात्र त्या ठिकाणी मराठा बांधवांचे खाण्यापिण्याचे हाल होत असून त्या अनुषंगाने सेनगांव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या पुऱ्या,चिवडा व इतर खाद्यपदार्थ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.