परळी तालुक्यातील सिरसाळा ते कावळ्याचीवाडी रस्त्यावर वाघाडा येथील चौकात दुचाकीवरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याप्रकरणी संबंधित चालकाच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कमल अशोक वय 54 वर्ष असे त्या मयत महिलेचे नाव आहे याप्रकरणी अशोक नागोराव मदने यांच्या फिर्यादीवरून सुखदेव कारभारी सलगर यांच्या विरोधात परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत