यावल शहरातील बाजार समितीत गवंडी कामगारांना भांडे वितरण होत होते. मात्र दोन दिवस वितरण रेंगाळल्याने व वेबसाईट बंद पडल्याने भांडे वितरण झाले नाही. तेव्हा संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी भुसावळ टी पॉईंट येथे येऊन थेट रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांची समजूत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी काढली, आंदोलकांची बाजू चंद्रकला ताई इंगळे यांनी मांडली. व तहसीलदारांना निवेदन देऊन ऑफलाईन भांडे वितरण व्हावे अशी मागणी करण्यात आली.