अन्सारुल मुस्लिमीन बार्शीटाकली यांनी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये "आय लव्ह मुहम्मद" फलक लावल्याप्रकरणी २५ मुस्लिम तरुणांवर दाखल झालेला एफआयआर हा संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा संघटनेने केला. कलम १४, १९ आणि २१ नुसार समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हमी दिलेली असून श्रद्धेवरील प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा होऊ शकत नाही, असे संघटनेचे मत आहे.