सांगोला पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करून सुमारे तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास वाघमोडे वस्ती, सावे (ता. सांगोला) परिसरात करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल जालिंदर टाकळे (वय ४२, रा. लक्ष्मीहीवडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) हा आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये (एमएच १३, एएक्स ७३६१) शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता माण नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आला आहे.