नांदेड शहरातील चैतन्यनगर परीसरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे बांधकाम कामगार महिलांना भांडे किट मिळणार म्हणून लेखी पत्र देऊन आज बोलाविले होते परंतु कोणीच शासकीय कर्मचारी, कंपीनीचे कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे माहुर किनवट तालुक्यासह इतर तालुक्यातून आलेल्या बांधकाम कामगार महिलांची हेळसांड झाली आहे यासंदर्भात आज सायंकाळी साडेपाच वाजता सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी प्रशासनाने लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होणार असल्याचे आपल्या प्रतिक्रिया द्वारे आज म्हटले आहे.