कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील शंकर वाघोजी खांडरे वय 42 वर्षे हे आज दि.12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वा.च्या सुमारास नांदेड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या दुचाकीवरून डोंगरकडा येथे येत असताना अर्धापूर ते डोंगरकडा दरम्यान पार्डी शानी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिली आहे धडक दिल्यानंतर ते खाली रस्त्यावर पडले असता त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने ते पूर्णतः चिरडल्या गेले,यामध्ये त्यांचा जागेवर मृत्यू झाला असल्याची माहिती डोंगरकडा गावकऱ्याकडून प्राप्त झाली आहे