औसा-गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे औसा मतदारसंघातील काही भागात अतिवृष्टी झाली असून शेतीपिकांचे, रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा येथे दुपारी दोन वाजता तातडीची प्रशासकीय आढावा बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.