बाबुपेठ, जुनोना चौक येथील हत्या प्रकरणातील गुन्हयातील मुख्य आरोपी हे गुन्हा करुन फरार झाले होते, प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे वेगवेगळे शोध पथके तयार करुन काल दि ३१ जुलै ला सायंकाळी ६ वाजता च्या सुमारास आरोपीतांचा शोध घेण्यासाठी तंत्रबध्द कौशल्यपूर्ण सखोल तपास करुन अथक परिश्रम घेवुन गुन्हयातील मुख्य आरोपी सोनुसिंग जितसिंग टाक इतर दोघाना अटक केली आहे.