धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी शासनाने काढलेला ‘सगेसोयरे’ निकषावरील जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. ओबीसी प्रवर्गात आधीच ३५० पेक्षा अधिक जाती असून त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही. अशावेळी मराठा समाजाचा समावेश अन्यायकारक ठरेल, असा दावा करत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.