बैलावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.किन्ही सवडत येथील शेतकरी संदीप मधुकर सवडतकर यांच्या मालकीचे शेत कुसुंबा शिवारात असून, शेतालगतच्या पडीतात जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. दरम्यान, बिबट्याने अचानक हल्ला करत एका बैलाचा बळी घेतला. ११ सप्टेंबर रोजी वनपाल नेवरे, खान, वनरक्षक बी. के. पवार, प्रीतम चव्हाण तसेच वैद्यकीय अधिकारी सिंहलता यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा क