अंजनगाव सुर्जी व दर्यापूर शहर व तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या शहानूर मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेमी ने उघडण्यात आले असून नदीकाठी वसलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.शहानूर मध्यम प्रकल्पाची जलाशय पातळी ४४६.३५ मी.असून साठ्याची टक्केवारी ८१.२५ % इतकी आहे. धरण प्रचलन सूची नुसार ऑगस्ट अखेर पाणी पातळी ४४५.०५ मी व पाणीसाठा ७५.११% अपेक्षित आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले