आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान, उपचार व शस्त्रक्रिया) स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात संपन्न झाले होते. या शिबीराचा राजुरा परीसरातील ४३६४ नागरीकांनी लाभ घेतला; त्यापैकी ५०३ रूग्ण विविध शस्त्रक्रियांसाठी पात्र ठरले. त्या अनुषंगाने आज दि.२५ आगस्ट ला १२ वाजता आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय राजुरा येथून १८ रुग्णांची पाचवी रुग्ण तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना झाली.