लातूर :-शहरातील अतिक्रमणाविरोधात आज (10 सप्टेंबर) सकाळपासून लातूर महापालिकेने मोठी कारवाई हाती घेतली. पहाटे सहा वाजल्यापासूनच मनपा पथक व पोलिस प्रशासनाच्या मदतीने विविध ठिकाणी अतिक्रमणावर बुलडोजर फिरवून अनेक बांधकामे, फूटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.