दुर्गेवाडी येथील ग्रामस्थांनी सलग पंचवीस वर्षे जपलेली ‘एक गाव, एक गणपती’ ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि सामाजिक ऐक्याने पाळली जात आहे.विभक्त होत चाललेल्या समाजात आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून दुर्गेवाडीचे ग्रामस्थ सणासुदीच्या काळात सामाजिक ऐक्याचा एक आदर्श उभा केला आहे.ही संकल्पना गावात प्रथम काही तरुणांच्या पुढाकाराने रुजली.