आठ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री शरद पवार पवार हे दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर असून आज त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान त्यांची वाट पाहत असणाऱ्या प्रसार माध्यमांची त्यांनी संवाद साधला नाही. तेथे विमानतळावरून रवाना झाले.