करमाळा तालुक्यातील देवीचा माळ येथील कमलाई देवी मंदिरातील उत्सव मुर्तीच्या दागिन्याची चोरी करणाऱ्याला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून २४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जप्त केले आहेत. सागर बाळू राऊत (वय ३१, रा. कुंकुगल्ली, करमाळा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही चोरी दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटेच्या दरम्यान झाली होती. याची फिर्याद मंदिराचे पुजारी रोहीत महादेव पुजारी यांनी दिली होती. अखेर चोरटा सापडला आहे.