भोई समाज, विहिंप बजरंग दल, भाजपा, शिवसेना व सकल हिंदू समाज संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, अकोला जिल्ह्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तोहित समीर (रा. गुलजारपुरा अकोला) या नराधमाने पाशवी अत्याचार केला. सदर आरोपी फरार असुन त्याला त्वरीत अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.