राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी, नेपाळमधील सत्तापालटाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नेपाळमधील सत्तापालटाचा उल्लेख करत खडसे म्हणाले की, “यापूर्वी श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान सत्तापालट झाली, आता तुमचा नंबर आहे,” असे थेट विधान करून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात गुरुवारी ११ सप्टेंबर दुपारी १२ वाजता बैठकीत बोलत होते.