शहरात २२ सप्टेंबरपासून ब्रह्मोत्सव तथा नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. उत्सवाचा काळात शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. उपद्रवी घटकांवर पोलिसांची बारीक नजर असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली. ब्रह्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक झाली.