बागलाण तालुक्यातील लखमापुरातील मोटर चोरी प्रकरण उघड...पाच आरोपी अटक, मुद्देमाल जप्त बागलाण तालुक्यातील लखमापुर गावातील विहिरीतून इलेक्ट्रीक मोटर चोरी प्रकरणात सटाणा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. त्यांच्या कडून ११ इलेक्ट्रीक मोटर, पंप, जलपरी आणि दोन दुचाकी असा एकूण ₹1,13,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अतुल बोरसे, दत्तात्रेय राऊत आणि पथकातील रुपेश ठोके, सिकंदर कोळी, नितीन जगताप, समाधान कदम यांनी केली