म्हसरूळ परिसरातील महाजन गार्डन जवळ, रासबिहारी मेरी येथे 31 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेतल्याची घटना घडली असून आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संकेता शंतनू जोशी राहणार अमृतयोग अपार्टमेंट, श्रीपाद कॉलनी, प्रमोद महाजन गार्डन जवळ, रासबिहारी मेरी यांनी राहत्या घरात बेडरूम मध्ये फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. तिचे वडील शेखर मीठसागर यांनी औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.