कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी मुंबई येथील प्रसिद्ध असलेल्या लालबाग राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या प्रसंगी आमदार संतोष बांगर यांचा लालबागचा राजा गणेश मंडळाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्या अनुषंगाने कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी मुंबई येथील लालबागचा राजाचे मनोभावे दर्शन घेतले आहे.