आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद शहरातील श्री संत संताजी महाराज संकुल येथे तेली समाज पंच मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला तसेच समाजासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.