नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चिनोदा फाट्याजवळ शासकीय आश्रम शाळा जांभई येथील शिक्षक भागवत जगताप यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयाच्या पथकाने पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात शिक्षक भागवत जगताप आणि मुख्याध्यापक अनिल झाल्टे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.