जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून एका शेतात नेऊन बस चालकाने विद्यार्थीनीला धमकी देत अत्याचार केला असल्याचे समोर येत आहे, या घटनेमुळे संपूर्ण जळगांव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र बस चालकाने अत्याचार केल्याचा पुरवणी जवाब पीडितेने दिला आहे,