साकोली येथील तलाव वार्डातील श्री विश्वकर्मा मंदिर चौकातील विहिरीचे पाणी दूषित झाल्याने या परिसरात रोगराई पसरत आहे संततधार पावसाने या पिण्याच्या पाण्यात आजूबाजूचे पाणी गेल्याने पाणी गडूळ झाले.या पाण्यात ब्लिचिंग टाकून पिण्यायोग्य करावे व विहिर दुरुस्त करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी शनिवार दि.26 जुलैला दुपारी12वाजता जनसमस्या अंतर्गतफ्रीडम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्या उपस्थितीत केली.संपर्क केला असता मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी त्वरित दखल घेण्याचे आश्वासन दिले