धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात ३ ऑक्टोबर रोजी भव्य धम्म मेळावा आयोजित करण्यात आला असून यामध्ये जनसागर उसळणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा ६९ वा वर्धापन दिन असून कार्यक्रमाचे मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर करणार आहेत. मिरवणुकीची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून होऊन विविध मार्गाने क्रिकेट क्लब मैदानावर होणार आहे. लेझीम प