गडचिरोली पोलीस दलाने भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत 'भारत कृत्रिम अंग निर्माण निगम' (ALIMCO), मुंबईच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण १,३०० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली, तसेच २०७ जणांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.