परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे, जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे, यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे 14 दरवाजे उघडण्यात आले असून यामुळे गंगाखेड शहराजवळील बालाजी मंदिर परिसरातील घाटावरील सर्व मंदिरे आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता पाण्याखाली गेली आहेत.