अंबवडे ता. खटाव येथील शेतमजूर सुरेश रघुनाथ गायकवाड वय ४८ हे अंबवडे - गोरेगाव येरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली. वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांचा रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू होती. वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेली माहिती अशी की अंबवडे येथील सुरेश रघुनाथ गायकवाड हा शेतमजूर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंबवडे - गोरेगाव या येरळा नदीच्या पुलावरून येत असताना वाहून गेल्याचे समजले.